गावगुंडांना 'मोका' लावणार : संदीप पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

पुणे : हवेली पूर्व भागातील विक्रेते, व्यावसायिक, व्यापारी यांना गावगुंडांकडून हप्ते मागितले जात असून, विरोध केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा प्रकार काही दिवसांपासून घडत आहे. गावगुंडांच्या दहशतीचा व्यावसायिकांनी धसका घेतला असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची पाटील यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित गावगुंडांवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कारवाईचे आदेश दिले. 

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, भागीरथ जांगीड, रमेश सोळंकी आदींच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक पाटील यांची पोलिस अधीक्षक कार्यालयात भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन दिले. संघटनेतील सदस्यांनी गावगुंडांकडून त्यांना दिल्या जात असलेल्या त्रासाबाबतची कैफियत पाटील यांच्यासमोर मांडली. 

उरुळी देवाची, वडकी या भागातील किरकोळ विक्रेते, व्यावसायिक व व्यापाऱ्यांना गावगुंडांकडून हप्ते मागितले जात आहेत. हप्ते न दिल्यास किंवा त्यांना विरोध केल्यास विक्रेत्यांना दमदाटी करणे, दगडफेक करणे, मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण केली जात आहे. त्यामुळे विक्रेते, व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी त्यांचा धसका घेतला आहे.

त्याबाबत स्थानिक पोलिसांकडे गेल्यानंतर त्यांच्याकडून न्याय दिला जात नसल्याचेही निवंगुणे यांनी सांगितले. पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेऊन स्थानिक पोलिसांना कारवाईचे आदेश दिला. 

Web Title: will be Action on Village Gunda Under Mocca says SP Sandip Patil