Pune News : रंगभूमी संग्रहालयासाठी पाठपुरावा करणार; नीलम गोऱ्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. नीलम गोऱ्हे

रंगभूमी संग्रहालयासाठी पाठपुरावा करणार; नीलम गोऱ्हे

पुणे : महाराष्ट्राला नाटकाचा समृद्ध वारसा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी रंगभूमी संग्रहालयाची संकल्पना मांडली. त्याचा मी योग्य तो पाठपुरावा करील, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी दिली.

हेही वाचा: मोठी बातमी! गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान

भरत नाट्य संशोधन मंदिर येथे आयोजित 'स्वरनाट्य रसगंगा’ पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे १५० वर्षांतील मराठी रंगभूमीचा माहितीपूर्ण रंजक इतिहास ‘स्वरनाट्य रसगंगा’ या नावाने पुस्तक रूपात मांडण्यात आला आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी, रवींद्र खरे, संस्थेचे अध्यक्ष आनंद पानसे, पुस्तकाच्या लेखिका अर्चना साने, यशश्री पुणेकर तसेच संपादक गोपाळ अवटी, आदी उपस्थित होते. इतिहासाची नव्याने ओळख करून देणे आवश्यक असते. म्हणून हे पुस्तक महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर रंगभूमी समजून घ्यायला हवी. अनेक संगीत नाटकांनी सामाजिक विषयाला वाचा फोडली आहे. या पुस्तकाच्या रूपाने संगीतनाटकाचा इतिहास संकलित झाला आहे, असे मत गोर्हे यांनी मांडले.

हेही वाचा: ST STRIKE: विलीनीकरणाची मागणी मान्य होऊ शकत नाही - अनिल परब

पोंक्षे म्हणाले,"नाशिकच्या साहित्य संमेलनातून सावरकरांचे नाव वगळण्यात आले आहे. जेंव्हा साहित्य, संस्कृती दुबळी होते. तेंव्हा ते राष्ट्र विस्मृतीत जायला वेळ लागली नाही, असे सावरकरच सांगतात. या पुस्तकातून मराठी रंगभूमीचा इतिहास पुन्हा उजळला आहे. मराठी रंगभूमीचा संग्रहालय मुंबईत असावे, ही मुख्यमंत्र्यांची भावना आहे. त्यासाठी हे पुस्तक महत्वपूर्ण ठरेल." रंगभूमीचा वारसा पुढे नेणारे आणि पडद्यामागच्या कलाकारांच्या योगदान पुस्तक रूपाने समोर येत असल्याची भावना लेखिकांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन अभय जबडे यांनी केली.

loading image
go to top