आंबेगावातील शेतकऱ्यांना दिलासा देणार: वळसे पाटील

मंचर (ता. आंबेगाव) : रामनगरी मैदानावर झालेल्या कार्यक्रमात बोलताना विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील. या वेळी उपस्थित गोवर्धन दूध प्रकल्पाचे अध्यक्ष देवेंद्र शहा (उजवीकडे) व कार्यकारी संचालक प्रीतम शहा (डावीकडे).
मंचर (ता. आंबेगाव) : रामनगरी मैदानावर झालेल्या कार्यक्रमात बोलताना विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील. या वेळी उपस्थित गोवर्धन दूध प्रकल्पाचे अध्यक्ष देवेंद्र शहा (उजवीकडे) व कार्यकारी संचालक प्रीतम शहा (डावीकडे).

मंचर (पुणे) : "आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दुष्काळामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे. सरकारी यंत्रणेने दुर्लक्ष केले, तरी भीमाशंकर कारखाना, बाजार समिती, शरद बॅंक आदी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले जाईल. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर व पशुधन वाचवण्यासाठी चाऱ्याची सोय केली जाईल,'' अशी ग्वाही विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मंचर (ता. आंबेगाव) येथे रामनगरी मैदानावर सोमवारी (ता. 29) रात्री गोवर्धन दूध प्रकल्पाचे अध्यक्ष देवेंद्र शहा व अभिनेते गोविंदा यांच्या हस्ते वळसे पाटील यांचा 62 वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रकाश शहा, प्रीतम शहा, पूर्वा वळसे पाटील, प्रीती शहा, नेत्रा शहा उपस्थित होत्या. अक्षाली शहा यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी अभिनेते भाऊ कदम, सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, आनंद शिंदे, विनोद साबळे आदी 40 कलाकारांनी सादर केलेल्या कलेला उपस्थित जनसमुदायाने भरभरून दाद दिली.

या वेळी वळसे पाटील यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ""सन 1990 मध्ये जनतेने मला आमदार केले. त्या वेळी पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई होती. दिवाळीनंतर शेतजमीन पडीक ठेवावी लागत होती. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे डिंभे धरण, उजव्या, डाव्या कालव्याचे, मीना व घोड नदीवर बंधाऱ्याची कामे झाली आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. मतदारसंघाच्या प्रगतीत पवार कुटुंबाचे मोठे योगदान आहे. जनतेचा पाठिंबा व आशीर्वादामुळे मला यशस्वी वाटचाल करता आली.''

देवेंद्र शहा म्हणाले, ""वळसे पाटील यांच्यामुळे उपजिल्हा रुग्णालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, क्रीडासंकुल, आदिवासी आश्रमशाळा, भीमाशंकर परिसर विकास आदी कामे झाली. गोवर्धन दूध प्रकल्पाला त्यांनी वेळोवेळी सहकार्य केले. त्यामुळे गोवर्धन दूध प्रकल्पाचे दुग्धजन्य पदार्थ 47 देशांत विकले जातात. तीन हजार जणांना रोजगार मिळाला आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com