जुन्या नोटा स्वीकारणार नाही 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

पुणे -  केंद्रीय आर्थिक व्यवहार खात्याच्या सचिवांनी पत्रकार परिषदेतून दिलेला आदेश केवळ तोंडी असल्याचे सांगत पुण्यातील खासगी रुग्णालयांच्या संघटनेने चलनातून रद्द झालेल्या पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत घेतला. त्यामुळे बहुतांश रुग्णांच्या नातेवाइकांना दोन हजार रुपयांच्या नव्या नोटेसह डेबिट, क्रेडिट, ऑनलाइन आणि चेक या माध्यमातून रुग्णालयाचे बिल भरावे लागणार असल्याचे मंगळवारी रात्री स्पष्ट झाले. 

पुण्यातील रुग्णालय संघटनेने तातडीची बैठक आयोजित केली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी शहरातील प्रमुख रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याबाबत संघटनेचे अध्यक्ष बोमी भोट म्हणाले, ""आजपासून हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारायच्या नाहीत, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याला रुग्णालयाशी संबंधित औषध दुकाने अपवाद राहतील. तेथे पाचशे-हजारच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत.'' 

संघटनेच्या सचिव मंजूषा कुलकर्णी म्हणाल्या, ""आतापर्यंत रुग्णालयांमधून जुन्या नोटा स्वीकारल्या जात होत्या. त्याबाबत सरकारने लेखी सूचना दिलेली होती; पण नव्याने घेतलेल्या निर्णयाची कोणत्याही माध्यमातून माहिती रुग्णालयांपर्यंत आलेली नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासन यापैकी कोणीही त्याबाबत कळविलेले नाही. त्यामुळे पाचशे-हजार रुपयांच्या नोटा आजपासून स्वीकारल्या जाणार नाहीत. रुग्णांना डेबिट, क्रेडिट, ऑनलाइन या माध्यमातून बिल भरता येईल.'' या सर्व प्रक्रियेत रुग्णाची गैरसोय होणार नाही, याची काळची सर्व रुग्णालयांकडून घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Will not accept the old notes