पदवी शिक्षणाबरोबर संशोधनाची संधी उपलब्ध करणार - अनुप बॅनर्जी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

‘वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाची गरज कायम असते. यासाठी आता पदवी शिक्षणा दरम्यानच वैद्यकीय विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे मत लष्करी वैद्यकीय सेवेचे (एएफएमएस) महासंचालक लेफ्टनंट जनरल अनुप बॅनर्जी यांनी व्यक्त केले.

पुणे - ‘वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाची गरज कायम असते. यासाठी आता पदवी शिक्षणा दरम्यानच वैद्यकीय विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे मत लष्करी वैद्यकीय सेवेचे (एएफएमएस) महासंचालक लेफ्टनंट जनरल अनुप बॅनर्जी यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लष्करी वैद्यकीय सेवेच्या ६८ व्या वार्षिक परिषदेचे आयोजन गुरुवारी केले होते. त्या वेळी ते बोलत होते. तीनदिवसीय चालणाऱ्या या परिषदेत जैविक, रासायनिक, रेडिओलॉजिकल आणि अणूहल्ला व युद्धपरिस्थितीत देण्यात येणारी वैद्यकीय सेवा याबाबत शोधनिबंध सादर केले जाणार आहेत. 

पेरूचा भाव कमी न केल्याने विक्रेत्यावर चाकूने वार

लेफ्टनंट जनरल बॅनर्जी म्हणाले, ‘‘आतापर्यंत पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी विविध वैद्यकीय संशोधन करत होते. परंतु ही वैद्यकीय संशोधन करण्याची संधी आता पदवीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा दिली जाणार आहे. याचबरोबर देशातील विविध लष्करी रुग्णालयांचा आधुनिकीकरण सुरू आहे. त्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणि उपचारासाठी आधुनिक उपकरणांचा समावेश आहे. तसेच शस्त्रक्रिया सुविधांची वाढ यावर भर देत आहोत.’’ सैनिकांवर येणाऱ्या मानसिक तणावाला दूर करण्यासाठी ‘बडी पार्टनर’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

अंतराळशक्ती प्रदर्शनातील देशाची सर्वांत मोठी मोहीम मानली जाणारी गगनयान या मोहिमेमध्ये लष्कराच्या वैद्यकीय विभागाचा सहभाग आहे. या मोहिमेसाठी निवडलेल्या अंतराळवीरांच्या चमूच्या आरोग्याची चाचणी हा विभाग करणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will provide research opportunities along with degree education