राज्यात बुधवारपर्यंत पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात उघडीप दिली आहे. हवामान काहीसे ढगाळ असले, तरी ऊन पडत असल्याने तापमानात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यात बुधवार (ता. 1) पर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात उघडीप दिली आहे. हवामान काहीसे ढगाळ असले, तरी ऊन पडत असल्याने तापमानात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यात बुधवार (ता. 1) पर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. 

राज्यात तापमानाचा पारा एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढल्याचे दिसून येते. विदर्भातील अकोल्यामध्ये शनिवारी 36 अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली. नाशिक, पणजी, बुलडाणा, नागपूर येथे कमाल तापमानात वाढ झाल्याची नोंद आहे. उत्तर दक्षिण उत्तर प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे. पूर्व बिहार परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत. येत्या 48 तासांत या परिसरात कमी दाबाचे क्षेत्रात निर्माण होईल, असा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. 

Web Title: will rain come between wednesday