आळेफाटा पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी प्रस्ताव पाठवणार - सुनील फुलारी

सध्या लागलेली लोकसभेच्या निवडणुका अनुषंगाने तसेच जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण सुरू असल्याने पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अंतर्गत आळेफाटा पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर येथील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर उपस्थित पत्रकार परीषदेत ते बोलत होते .
will send proposal for building of Alephata Police Station  Sunil Phulari
will send proposal for building of Alephata Police Station Sunil PhulariSakal

- राजे‌श कणसे

आळेफाटा : पोलीस स्टेशनची इमारत अपुरी पडत असून जिल्हा पोलीस निरीक्षक आलेले प्रस्ताव उपलब्ध असलेली जागा याचा विचार करून एक सुनियोजित आराखडा तयार करण्यासाठी येथील पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी प्रस्ताव पाठवणार आहे असे आश्वासन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक (आय. जी) सुनील फुलारी यांनी आळेफाटा या ठिकाणी दिले.

सध्या लागलेली लोकसभेच्या निवडणुका अनुषंगाने तसेच जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण सुरू असल्याने पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अंतर्गत आळेफाटा पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर येथील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर उपस्थित पत्रकार परीषदेत ते बोलत होते .याप्रसंगी अप्पर पोलिस अधिक्षक रमेश घोरपडे,

पुणे जिल्ह्याचे एस.पी. पंकज देशमुख,जुन्नर चे उपविभागीय अधिकारी रविंद्र चौधरी,आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीष होडगर,सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर,अनिल पवार,रागिणी कराळे आदी अधिकारी उपस्थित होते.

या वेळी फुलारी म्हणाले की सध्या लोकसभेची निवडणुक पक्रिया लागली असुन शासनाचे आणि निवडणूक आयोगाचे निर्देश पोलीस सिंग बाबत जे नियम आणि कायदे आहेत त्यांची अंमलबजावणी होती का स्थानिक पोलिसांचा जनता आणि इतर घटकांशी सुसंवाद आहे का तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक रूट मार्च घेत असुन रोज कॉम्बिन आणि नाकाबंदी जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत व या ठिकाणी वाहनांची चेकिंग केली जात आहे .

अवैध शस्त्र दारुगोळा ,अवैध धंदे इतर काही प्रमाणाची तस्करी रोख रक्कम ची वाहतूक या सर्वांवर वचक राहण्यासाठी चेकिंग करून कारवाई करण्यात येत आहे. प्रतिबंधक प्रतिबंधक कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

व पोलीस अधिकारी गाव भेटी देऊन निवडणूक केंद्राला भेट देत आहेत तेथे सुरक्षा व्यवस्था कशी ठेवण्यात येईल याबाबत एक आराखडा तयार करण्यात आलेला आहे व पोलीस सिंग प्रभावी या क्षेत्रात कसे होईल समाज सुरक्षित कसा राहील येणारी निवडणूक निर्भीड वातावरणात कशी होईल याबाबत सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत व कायदा सुव्यवस्था अडचणीत आणणा-यांची गय केली जाणार नाही असा कडक इशारा ही यावेळी त्यांनी दिला.याप्रसंगी सुनील फुलारे यांचे स्वागत आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक सतीष होडगर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com