सौरचक्राचा परिणाम जीवसृष्टीवर होणार? 

earath northen lights.jpg
earath northen lights.jpg

पुणे : पृथ्वीवरील हवामानात जसे बदल होतात, तसेच सुर्यावरील किंवा अवकाशातील हवामानातही बदल होतात. 25व्या सौरचक्राला डिसेंबर 2019 पासून सुरवात झाल्याची पुष्टी नासाच्या सौरभौतिकशास्त्रज्ञांनी नुकतीच केली आहे. याचा परिणाम जीवसृष्टीवर होतो का, नक्की कसे असेल हे सौरचक्र, याचाच घेतलेला हा आढावा. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सौरचक्र म्हणजे काय? 
सूर्याच्या पृष्ठभागावर सौरडागांचे प्रमाण वाढणे आणि कमी होण्याच्या चक्राला सौरचक्र असे म्हणतात. या वेळी सूर्याचा दक्षिण आणि उत्तर ध्रुव एकमेकांची जागा बदलत असतात. 

सौरडाग म्हणजे काय? 
प्रचंड चुंबकीय बदलामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर विशिष्ट ठिकाणचा वायू, ऊर्जा, प्रकाश अवकाशात फेकली जाते, त्याला सौरडाग असे म्हणतात. भोवतालच्या भागापेक्षा तो जरा गडद असतो. जोडीने दिसणारे हे सौरडाग पृथ्वीपेक्षा मोठे असतात. 

सौरचक्राचा अंदाज कसा घेतात? 
सौरडागांची वाढती संख्या सौरचक्राची सुरवात सांगते. सूर्याच्या पृष्ठभागावरील वायू, ऊर्जा, पदार्थ आदींच्या हालचाली आणि संख्येच्या आधारे त्यावर लक्ष ठेवले जाते. 

25वे सौरचक्र ? 
शास्त्रज्ञांनी 1755पासून सौरचक्रांची गणना आणि अभ्यास करायला सुरवात केली आहे. डिसेंबर 2019 मध्ये 25व्या सौरचक्राला सुरवात झाली आहे. मागच्या तीनही सौरचक्रे ही सामान्य सौरचक्रांपेक्षा कमी ताकदीची होती. येणाऱ्या सौरचक्राची तीव्रता कशी असेल हे पाहणे गरजेचे आहे, असे राष्ट्रीय रेडिओ खगोलशास्त्र केंद्राचे वैज्ञानिक डॉ. दिव्य ओबेरॉय यांनी सांगितले. 

त्याचा परिणाम जीवसृष्टीवर होतो? 
नाही, पृथ्वीवरील हवामानावर सौरचक्राचा कोणताही परिणाम होत नाही. फार तर अवकाशातील हवामानावर होतो. क्वचितच येणाऱ्या मोठ्या सौरवादळांमुळे उपग्रहांना थोडाफार धोका होऊ शकतो. तसेच पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर झालेल्या परिणामही पहायला मिळतो. उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर कधी-कधी दिसणाऱ्या रंगबेरंगी प्रकाश शलाकांची (अरोरा) वारंवारिता यामुळे वाढते. मोठ्या सौरवादळांच्या ध्रुवाजवळून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या दिशानिर्देशन प्रणालीवरही परिणाम होतो. त्यामुळे त्यांना लांब अंतरावरून जाण्याचे सांगण्यात येते. 

आकडे बोलतात.. 
- सौरचक्राचा एकूण कालावधी ः 11 वर्षे 
- आतापर्यंत किती सौरचक्रांचा अभ्यास झाला ः 24 
- आजपर्यंतच्या सर्वांत मोठ्या सौरडागाचा आकार ः 10 पृथ्वी बसतील एवढा. 
 

सौरचक्राचा मध्य आणि सौरडागांचा उच्चतम बिंदू पुढल्या पाच ते सहा वर्षांनी असेल. याच कालावधीत इस्रोचे "आदित्य एल-1' सूर्याच्या आढावा घेण्यासाठी अवकाशात असेल. त्यामुळे सूर्याचे निरीक्षण अधिक चांगल्या पद्धतीने घेता येईल. आम्हीही सौरचक्रावर नजर ठेवून आहे. 
- डॉ. दिव्य ओबेरॉय, सौरभौतिकशास्त्रज्ञ, एनसीआरए, पुणे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com