खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार - श्रीवास्तव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

इंदापूर तालुक्यातील खंडकरी 
शेतकऱ्यांच्या जमीनीसंदर्भातील अडचणी तातडीने दूर 
करू असे आश्वासन आज महसूल खात्याने माजी 
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना दिले. महसूल खात्याचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत खंडकरी 
शेतकऱ्यांसमवेत हर्षवर्धन पाटील यांनी बैठक घेतली. 

भवानीनगर : इंदापूर तालुक्यातील खंडकरी 
शेतकऱ्यांच्या जमीनीसंदर्भातील अडचणी तातडीने दूर 
करू असे आश्वासन आज महसूल खात्याने माजी 
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना दिले. महसूल खात्याचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत खंडकरी 
शेतकऱ्यांसमवेत हर्षवर्धन पाटील यांनी बैठक घेतली. 

यावेळी पाटील यांनी खंडकरी शेतकऱ्यांना जमीनींचे वाटप 
झालेले आहे. मात्र, संपूर्ण प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली 
नाही. काही अडचणी आजही तशाच आहेत हे 
सरकारच्या निदर्शनास आणून दिले. या अडचणी महसूल 
विभागाने तातडीने दूर करून खंडकरी शेतकऱ्यांना न्याय 
द्यावा अशी मागणी पाटील यांनी केली. 
यावेळी पाटील 
यांनी खंडकरी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन 
शिष्टमंडळासमवेत अप्पर मुख्य सचिवांना दिले. 
खंडकरी शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने दूर करू असे 
आश्वासन श्रीवास्तव यांनी शिष्टमंडळास दिले. 
या बैठकीस खंडकरी शेतकऱ्यांचे नेते बी.डी.पाटील, अॅड. 
पांडूरंग गायकवाड, बाळासाहेब डोंबाळे, माजी सभापती 
प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: will solve farmers land issue

टॅग्स