"सारथी'च्या विद्यार्थ्यांच्या अडचणी मार्गी लावणार - वडेट्टीवार

Will solve the problems of Sarathis students says vijay Vadettivar
Will solve the problems of Sarathis students says vijay Vadettivar

पुणे : "सारथी'च्या योजनांतर्गत स्पर्धा परीक्षेसह अन्य प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची थकीत रक्‍कम देण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक अडचणी तातडीने निकाली काढण्यात येतील. तसेच, मराठा कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती बहुजन कल्याण विभाग आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

वडेट्टीवार यांनी बहुजन कल्याण विभागाच्या मंत्रीपदाचा कार्यभार घेतल्यानंतर प्रथमच गुरुवारी (ता. 20) येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास (सारथी) संस्थेला भेट दिली. त्यांनी "सारथी'सह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वडेट्टीवार म्हणाले, यूपीएसी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा प्रश्‍न सोडविला आहे. उर्वरित प्रश्‍न दहा दिवसांत सोडविण्यात येतील. तसेच, कौशल्य विकास प्रशिक्षणच्या माध्यमातून मराठा कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला आणण्यात येईल. तसेच, याबाबत दर महिन्याला आढावा घेण्यात येईल. 

निर्भया बलात्कार प्रकरणात आता निवडणूक आयोगाची एन्ट्री

न्यायालयाचा निर्णय सर्वांना मान्य 
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत न्यायालयाने आज दिलेल्या निकालाबाबत वडेट्टीवार म्हणाले, "कायदा हा सर्वांना समान आहे. फडणवीस हे सुसंस्कृत राजकीय नेते आहेत. परंतु निवडणूक नामनिर्देशनपत्र दाखल करताना त्यांनी गुन्हा लपवला आहे. याबाबत न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांना मान्य असेल.'

मिसेस ट्रम्प जाणार दिल्लीतील शाळेत

केंद्र सरकारकडून द्वेषाचे राजकारण 
केंद्र सरकारने अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन केला आहे. मग मशिदीसाठी ट्रस्ट का नाही, असा प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला होता. त्याबाबत वडेट्टीवार म्हणाले, हा देश सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांचा आहे. केंद्र सरकारने द्वेषाचे राजकारण करणे योग्य नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना त्यांनी "एल्गार' प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) का सोपवला नाही? इतके वर्षे ते झोपले होते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com