Baramati News : विकासाचे उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करु - सुनेत्रा पवार

महायुतीने मला उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखविला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वप्नातील विकासाचे उद्दीष्ट साध्य करण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी ग्वाही बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दिली.
sunetra pawar
sunetra pawarSakal

बारामती : महायुतीने मला उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखविला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वप्नातील विकासाचे उद्दीष्ट साध्य करण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी ग्वाही बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दिली.

बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रीया व्यक्त करताना त्यांनी उमेदवारी दिल्याबद्दल महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे आभार व्यक्त केले. विकासाचा मुद्दा घेऊनच या निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी या वेळेस स्पष्ट केले.

बारामती लोकसभा मतदारसंघात फिरले असून जनतेत प्रचंड उत्साह आहे, हा उत्साह त्यांचे मत काय आहे हे सांगून जाते. लोकसभेची निवडणूक ही राष्ट्राची आहे, जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे, असेही त्या म्हणाल्या.

लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रीय प्रश्नावर आहे, राष्ट्र प्रथम आहे, त्या मुळे ही कौटुंबिक निवडणूक नसल्याचेही त्यांनी नमूद केला. अनेक मुद्दे आहेत, महिला सक्षमीकरण, युवकांच्या नोक-या, दुष्काळ अशा अनेक मुद्यांवर कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष....

सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भिगवण चौकात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. एकच वादा अजितदादांच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com