पवनचक्की, ऊर्जानिर्मितीची कार्यशाळा

workshop
workshop

पुणे - पवनऊर्जा म्हणजे काय आपल्याला माहीत असते. हवेच्या मदतीने पवनचक्कीच्या साह्याने वीजनिर्मिती केली जाते, हे आपण अभ्यासक्रमात शिकलो आहे. पण, छोटे विद्युत जनित्र आणि त्याला जोडलेल्या छोट्या पंख्यातून स्वतःच वीजनिर्मिती करून पाहणे व त्यामागचे सायन्स समजून घेणे, आपल्याला नक्कीच आवडेल. याच उद्देशाने चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ’ व संडे सायन्सने शनिवारी (ता. १६) कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा सायंकाळी पाच ते सहा या वेळेत विद्यापीठ रोडवरील सेंट्रल मॉलमध्ये होणार आहे.

यात हवेच्या प्रवाहाच्या मदतीने छोटी पवनचक्की तयार करायला शिकविणार आहे. तसेच वीजनिर्मिती कशी होते याचे प्रयोगामार्फत प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. पवनचक्की बनविण्यासाठी लागणारे सर्व विद्यार्थ्यांना साहित्य दिले जाणार असून, तयार केलेली पवनचक्की घरी नेता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com