esakal | प्रति पंढरपूर समजले जाणारे विठ्ठल मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

प्रति पंढरपूर समजले जाणारे विठ्ठल मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंहगड : सिंहगड रस्ता परिसरात मंदिर सुरू झाल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे. विठ्ठलवाडी येथील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल मंदिर सुरू झाल्याने नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारीला ज्या वारकऱ्यांना जाता येत नाही, असे वारकरी विठ्ठलवाडी येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी नित्यनेमाने येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी झालेली आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, आणि यंदाची आषाढी एकादशी यावेळी भाविकांना दर्शन घेता आले नाही मात्र घटस्थापनेच्या मुहूर्तावर घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यात मंदिरे खुली झाल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त करत विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. आज दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा: पुणे : मुसळधार पावसाने वारजे झाले चक्काजाम

अभिषेक महापूजा आधी नित्य नियमित पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंदिर खुले झाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने राज्य शासनाच्या आदेशानंतरच कोरोनाचे सर्व नियम पालन करून मंदिर भाविकांसाठी खुले केले असल्याचे मंदिराचे विश्वस्त आणि माजी आमदार कुमार गोसावी यांनी सांगितले.

हेही वाचा: ड्रामा फीक्स आहे... आहे तो पर्यंत समाधानात रहायचे- स्वरुप कुमार

सुहास मुंगळे (भाविक) :- या आधीच मंदिरे खुले व्हायला हवी होती पण उशिरा का होईना मंदिरे खुले झाल्याने खूप आंनद झाला.

उर्मीला घोडके (भाविक) :- मंदिर खुले झाल्याने खूप आनंद झाला आहे. विठ्ठल रखुमाईच्या दर्शन घेता येणार आहे. याचा अधिक आनंद आहे.

loading image
go to top