Crime News : मित्राच्या मदतीने मुलीने केला आईचा खून

वडगाव शेरीतील धक्कादायक घटना, मुलीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
murder
murdersakal

पुणे - वडगाव शेरी भागात मुलीने मित्राच्या मदतीने सख्ख्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वच्छतागृहात पाय घसरून पडल्याने आईचा मृत्यू झाल्याचा मुलीने बनाव रचला. परंतु मुंबईतील नातेवाइकाने तक्रार दिल्यानंतर पोलिस तपासात खुनाचा हा प्रकार उघडकीस आला आहे.

मंगल संजय गोखले (वय ४५, राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मृत महिलेचे नातेवाईक विनोद शाहू गाडे (वय ४२, रा. गोवंडी, मुंबई) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मुलीसह तिच्या मित्राविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश मिलिंद शितोळे (रा. गणेशनगर, वडगावशेरी) आणि योशिता संजय गोखले (वय १८, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल गोखले यांच्या बॅंक खात्यातून मुलीने मित्राच्या मदतीने परस्पर पैसे काढले. ही बाब आईला समजल्यानंतर ती रागवेल, अशी तिला भीती होती. तिने आई झोपेत असताना तिच्या मित्राला घरातील हातोडा दिला. यशने मंगल यांच्या डोक्यात हातोड्याने वार करून जखमी केले. तसेच, मुलगी योशिताने आईचे स्कार्फने तोंड दाबून धरले.

हा प्रकार कोणाला कळू नये, यासाठी आई पाय घसरून पडल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचा बनाव रचला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत माने करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com