बिगर बासमती तांदूळ निर्यातीत घट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

पुणे - बिगर बासमती तांदूळाला केंद्र सरकारने ‘एमएसपी’ (किमान आधारभूत किंमत) लागू केल्याने भावात वाढ होऊन त्याचा परिणाम निर्यातीवर झाला आहे. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान १३ टक्‍क्‍यांनी घट झाली. तांदळाची निर्यातीतील घसरण रोखण्यासाठी आता केंद्र सरकारने ‘एमईएस’ योजना जाहीर केली आहे. त्यामुळे तांदळाच्या निर्यातीला चालना मिळण्याची शक्‍यता आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतासह पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम, चीनमधून मोठ्या प्रमाणात बिगर बासमती तांदूळ निर्यात केला जातो. यामध्ये भारतातून सर्वाधिक तांदळाची निर्यात करण्यात येते. यंदा प्रथमच केंद्र सरकारकडून तांदळासाठी किमान आधारभूत किंमत लागू करण्यात आली. त्यामुळे तांदळाचे भाव प्रती क्विंटल तब्बल दोनशे रुपयांनी वाढले. 

बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत झालेली घट लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘मर्चंटाईज्‌ एक्‍पोर्टस्‌ फोरम इंडिया’ (एमईएस) ही योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत  मार्च २०१९  पर्यंत निर्यात होणाऱ्या बिगर बासमती तांदळावर निर्यातदारांना केंद्र सरकारमार्फत ५ टक्के रक्कम इन्सेटिव्ह स्वरूपात देण्यात येणार आहे. चालू वर्षी ८० ते ९० लाख टन तांदूळ निर्यात करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. तांदूळ निर्यातीत झालेली मोठी घट लक्षात घेऊन शासनाने ही योजना सुरू केली असल्याचेही तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले.

प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत भारतातील तांदळाचे भाव दहा टक्‍क्‍यांनी जास्त आहेत. त्यामुळे, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया व आफ्रिका आदी देशांनी इतर देशांकडून तांदूळ खरेदी करण्यास प्राधान्य दिले. त्याचा परिणाम निर्यातीवर झाला. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान ३७ .२० लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली. गेल्या वर्षी हे प्रमाण ४३ लाख टन एवढे होते. 
- राजेश शहा, तांदूळ व्यापारी  

Web Title: Without Basmati Rice Export Decrease