esakal | राज्य वखार महामंडळास सुमारे १११ कोटींचा नफा
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य वखार महामंडळास सुमारे १११ कोटींचा नफा

राज्य वखार महामंडळास सुमारे १११ कोटींचा नफा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य वखार महामंडळास २०२०-२१ या वर्षात ११० कोटी ७३ लाख रुपयांचा नफा झाला आहे. लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात गोदामे भाडेतत्वावर घेऊन धान्य साठवणूक क्षमतेत वाढ केली. यामुळे धान्य साठवणूक क्षमता २३ लाख टनांपर्यंत गेली आहे.

राज्य वखार महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली. त्यानंतर वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. तावरे म्हणाले, ‘‘वखार महामंडळास २०२० ते २१ या वर्षात ४२२ कोटी ४८ कोटींचे उत्पन्न मिळाले. तर २०१९ ते २० या काळातील उत्पन्न ३४० कोटी ६२ कोटी रुपये होते.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीसांचा मराठवाडा दौरा आणि पंकजा मुंडे आजारी

त्यामुळे महामंडळास कोरोनाच्या काळातही ११० कोटी ७३ लाख रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला. २०१९ ते २० या काळात हा नफा ६६ कोटी ३६ लाख एवढा होता. कोरोनाकाळात लॉकडाउन असताना सरकारकडून तूर, कापूस, हरभरा, उडीद या डाळींची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू होती. वखार महामंडळाच्या गोदामाची क्षमता १८ लाख टन एवढी होती. गोदामे कमी पडत असल्याने बाहेरील ३७० गोदामे भाडेतत्त्वावर घेऊन साठवणुकीची क्षमता २३ लाख टनापर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे नफा झाला.’’

कृषी गोदामे व लॉजिस्टिक पार्क उभारणार

महामंडळाने कृषी गोदामे व लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील जांबरगाव येथे सुमारे २५ एकर जमीन, तसेच पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे जवळील आंबी येथे २५ एकर जमीन खरेदी केली आहे. या ठिकाणी आधुनिक पद्धतीची गोदामे उभारण्यात येणार आहेत. गोदामांच्या जागेत मार्चअखेर ७९४.३२ एकरवरून ८२५.५० एकरपर्यंत वाढ झाली आहे. या वर्षात २४ हजार टनांपर्यंत अतिरिक्त साठवणूक क्षमता निर्माण करण्यासाठी महामंडळाने एकूण सहा ठिकाणी १२ गोदामांचे बांधकाम सुरू केल्याची माहिती दीपक तावरे यांनी दिली.

loading image
go to top