या मातेचे कृत्य पाहून लावाल डोक्याला हात; स्वतःची मुलगी दाखविण्यासाठी...

Woman Arrested for Kidnapping 5 Year old Girl in pune
Woman Arrested for Kidnapping 5 Year old Girl in pune

पुणे : पतीपासून ती तब्बल चार वर्ष दूर होती. या कालावधीत तिच्या पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यु झाला. मात्र, काही दिवसांपुर्वीच पतीने तिला सासरी बोलावले. आता पतीला पोटची मुलगी दाखवायची कशी ? यावर उपाय म्हणून तिने एका महिलेच्या साथीने रविवारी चक्क एका सोसायटीतील पाच वर्षांची मुलगी पळवून नेली. या धक्कादायक प्रकाराबाबत खबर मिळताच विमानतळ पोलिसांनी तपासाची सुत्रे हलवून अवघ्या आठ तासातच दोन्ही महिलांना बेड्या ठोकून मुलीची सुखरूप सुटका केली. 

रविवारी दुपारी तीन ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास लोहगावच्या निंबाळकर नगरमधील प्राईड आशियाना सोसायटीतील शिवाजी चांदमाने यांची पाच वर्षांची मुलगी घराच्या मागील बाजुस खेळत होती. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने मुलीस कशाचे तरी आमिष दाखवून मुलीला पळवून नेले. याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) बळवंत मांडगे यांच्या मागर्दशनाखालील पथकाने तपासाला सुरूवात केली. गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्व बाजुंनी आरोपींची माहिती काढली. त्यामध्ये जयश्री शिवाजी कोळी (वय 26), हिराबाई उर्फ बायडाबाई भानुदास खंडाळे (वय 55, रा. माईचा वाडा, कात्रज) यांची नावे उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचा आधार घेऊन सोलापुर गाठले. तेथील हैद्राबाद रोडवरील भवानी पेठेमध्ये खड्डा रघुजी ट्रान्सपोर्ट येथून दोघींना अटक केली. पोलिस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, पोलिस कर्मचारी अविनाश शेवाळे, विशाल गाडे, विश्‍वनाथ गोणे, संजय आढारी, राहूल मोरे, विनोद महाजन, प्रशांत कापुरे, नाना कर्चे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

..म्हणून केले मुलीचे अपहरण ! 
जयश्री काळे हिला दोन मुले व एक मुलगी होती. चार वर्षांपासून ती पतीपासून वेगळी राहात होती. जुलै 2019 मध्ये काळे ही नातेवाईकांसमवेत कात्रज येथे राहू लागली.दरम्यान, तिच्या पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यु झाला. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या पतीने तिला सोलापुरला पुन्हा माघारी बोलाविले. आता पतीला मुलगी कशी दाखविणार ? म्हणून तिने हिराबाई खंडाळे हिच्या मदतीने लोहगाव येथून पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याचे चौकशीत सांगितले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com