मेट्रोमनी वेबसाईटवर झाली ओळख; लग्न करतो सांगून महिलेची तब्बल दोन लाखांची फसवणुक ! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

नऱ्हे येथे राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेने याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला या व्यावसायिक आहेत. तर त्यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांना दुसरे लग्न करायचे असल्याने त्यांनी भारत मेट्रोमोनी डॉट कॉम या वेबसाईटवरील डिव्होरसी मेट्रोमोनी डॉट कॉम या संकेतस्थळावर अर्ज केला होता.​

पुणे : महिलेने लग्नासाठी मेट्रोमनी वेबसाईटवर नोंदणी केली. त्यानंतर एकाने महिलेशी संपर्क साधून तिच्यासमवेत लग्न करण्याची तयारीही दर्शविली. हळूहळू महिलेचा विश्‍वास प्राप्त केल्यानंतर, त्याने मुख्य विषयाला हात घातला, "भारतात आलोय, पण मेडीकलचे यलो कार्ड नसल्यामुळे दंड व तुझ्यासाठी महागडे गिफ्ट आणलेय, ते सोडविण्यासाठी पैसे भरावे लागताहेत' असे तिला सांगितले, तिनेही भाबडेपणाने दोन लाख भरले. हळूहळू पैशांची मागणी वाढू लागल्यावर आपली फसवणूक होतेय, हे तिच्या लक्षात आले आणि तिने थेट पोलिसात फिर्याद दिली ! 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

नऱ्हे येथे राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेने याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला या व्यावसायिक आहेत. तर त्यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांना दुसरे लग्न करायचे असल्याने त्यांनी भारत मेट्रोमोनी डॉट कॉम या वेबसाईटवरील डिव्होरसी मेट्रोमोनी डॉट कॉम या संकेतस्थळावर अर्ज केला होता. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने त्यांनी केलेल्या अर्जाचा संदर्भ देत त्यांच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर त्याने महिलेसमवेत विवाह करण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे फिर्यादी महिलेने त्याच्यावर विश्‍वास ठेवला. 

दरम्यान, ''काही दिवसांनी त्याचा फिर्यादीस आपण भारतात आलो आहे, मात्र माझ्याकडे मेडकीलचे यलो कार्ड नाही. त्यामुळे मला दंडापोटी 47 हजार रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे. तसेच मी परदेशातून तुझ्यासाठी महागडे गिफ्ट आणले असून विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडे दिड लाख रुपयांची रक्कम भरल्याशिवाय ते गिफ्ट देता येणार नाही,''असे महिलेस सांगितले. महिलेनेही त्याच्यावर विश्‍वास ठेवून दोन लाख रुपयांची रक्कम ऑनलाईन माध्यमाद्वारे त्यास पाठविली. त्यानंतर त्याच्याकडे पाठपुरावा केला, त्यावेळी तिला प्रतिसाद मिळाला नाही. 

संबंधीत व्यक्तीकडून महिलेकडे पैशांची सातत्याने मागणी होऊ लागल्याने महिलेस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे करीत आहेत. 

हे वाचा - कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण दिलासादायक; जाणून घ्या पुणे विभागातील स्थिती

फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी ः 
- कोणत्याही प्रकारच्या वेबसाईटद्वारे ओळख झालेल्या व्यक्तींना प्रतिसाद देऊ नका 
- अनोळखी व्यक्तींच्या फोन, ईमेल, मेसेजला उत्तर देऊ नका. 
- लॉटरी, गिफ्ट, सोने-चांदी, मौल्यवान वस्तू मिळण्याच्या आमिषाला भुलू नका. 
- व्हॉटसअप, फेसबुकवर आलेल्या कोणत्याही लिंकला प्रतिसाद देऊ नका. 
- फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंडरिक्वेस्ट स्विकारताना काळजी घ्या 
- अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करू नका 
- संशयास्पद फोन, मेसेजबाबत तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्याला माहिती द्या 
- संपूर्ण माहिती असल्याशिवाय ई-बॅंकिंग, ई-वॉलेट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman cokheated of Rs 2 lakh by pretext of getting married