Katraj News : कात्रज तलावात उडी मारून महिलेने आपले जीवन संपविले

कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात रविवारी महिलेचा मृतदेह सापडला. शनिवारी रात्रीच्या सुमारास एका महिलेने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
Katraj Lake
Katraj Lakesakal

कात्रज - कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात रविवारी महिलेचा मृतदेह सापडला. शनिवारी रात्रीच्या सुमारास एका महिलेने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाला रात्री साडेबाराच्या वेळी कॉल मिळाला.

कात्रज अग्निशमन दलाच्या जवानांकडून व पोलिसांकडून तलावात बोटीच्या साहाय्याने दोन ते तीन तास शोध घेण्यात आला. परंतु, रात्रीच्या वेळी मृतदेह मिळून आला नाही. त्यामुळे अग्निशमन दलाकडून सकाळच्या वेळी सात वाजता शोध घेण्यात आला. शोध मोहिमेदरम्यान मृतदेह गळाला लागला.

त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांकडून महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच, महिलेचा मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून येथे पाठवण्यात आला आहे. अंदाजे २२ ते २४ वर्षाची महिला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून ही कार्यवाही कात्रज अग्निशमन दलाचे तांडेल वसंत भिलारे, तांडेल प्रसाद कदम, वाहनचालक फारुख शेख आदीच्या पथकाने केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com