esakal | महिलेची आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

 Mother commits suicide by jumping into well with her child

महिलेची आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे-सोलापूर रस्त्यालगत असलेल्या म्हातोबाची आळंदी परिसरात घडली. हि घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली.

 कविता देवीदास भोसले (वय ३०, सध्या रा. भेकराईनगर, हडपसर, मूळ रा. उमरगा, उस्मानाबाद), प्रणित (वय 2) असे मृत्यु झालेल्यांची नावे आहेत. कविता भोसले या त्यांच्या दोन वर्षांच्या मुलासह बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी हडपसर पोलिसांनी ठाण्यात दिली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. तांत्रिक तपासात कविता म्हातोबाची आळंदी परिसरात असल्याची माहिती समजली. त्यानंतर लोणी काळभोर आणि हडपसर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला.

हेही वाचा: शाळाविना असलेल्या शिक्षकांना समुपदेशनाने देणार नियुक्त्या

दरम्यान, म्हातोबाची आळंदी परिसरातील विहिरीतील पाण्यात  एक महिला व मुलाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी रात्री दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात तरंगणारा मृतदेह कविता आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलाचा असल्याची खात्री पोलिसांनी पटवली. कविताने मुलासह आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही

loading image
go to top