कंटेनरचे चाक अंगावरून गेल्याने महिलेचा मृत्यू

मिलिंद संगई 
शुक्रवार, 4 मे 2018

बारामती (पुणे) : येथील भिगवण रस्त्यावर झालेल्या अपघातात आज एका महिलेस प्राण गमवावे लागले. सुनीता नितीन भापकर (वय 45, रा. वीरशैव मंगल कार्यालायनजीक बारामती) यांचा या अपघातात मृत्यू झाला.

सकाळी आठच्या सुमारास सम्यक दुकानानजीक हा अपघात झाला. सुनीता आपल्या दुचाकीवरून जिमला निघाल्या होत्या. त्याच वेळेस भिगवणकडे निघालेल्या कंटेनरची त्यांना जोरदार धडक बसली, यात त्यांची दुचाकी कंटेनर खाली गेल्याने त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांनी घटनस्थळी धाव घेत मदत केली. शहर पोलीस वेळेवर न आल्याने व 108 रुग्णवाहिकेने येण्यास नकार दिल्याने अखेर नागरिकांनी सुनीता यांना दवाखान्यात हलविले.
 
Web Title: woman died in accident of container and her two wheeler