अमरनाथ दुर्घटनेत धायरीतील महिलेचा मृत्यू

मुलाशी पंधरा मिनिटांपूर्वी व्हिडिओ कॉलवर बोलणं अन..
Woman dies in Amarnath accident Talk to child fifteen minutes on video call pune
Woman dies in Amarnath accident Talk to child fifteen minutes on video call pune sakal

धायरी : अमरनाथ येथील ढगफुटीत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातात पुण्यातील धायरी येथील सुनीता भोसले (वय-५२,राहणार ,गल्ली क्रमांक १७,ऐ,फॉरचून सोसायटी,रायकार नगर,धायरी)  या भाविक महिलेचा मृत्यू झाला आहे. दरड कोसळताना काही दगड डोक्यावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते. दुर्घटनेच्या १५ मिनिटांपूर्वी त्यांनी पुण्यात असलेल्या आपल्या मुलाशी व्हिडिओ कॉल वर बोलणे केले होते. त्यांच्या पंधरा मिनिटानंतर त्या आपल्यात नसल्याची माहिती वडिलांनी फोनवरून मुलाला दिली.या हृदयद्रावक घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. अमरनाथ यात्रेला ३० जूनला सुरुवात झाली आहे.अमरनाथ गुहे जवळ ढगफुटी झाली. अमरनाथ मध्ये दहा ते बारा हजार भाविक आहेत.

अमरनाथच्या गुहेत जवळ ढगफुटी झाली असून पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत असल्याचे समोर आलेल्या व्हिडिओ मधून दिसून येत आहे. अमरनाथ यात्रेसाठी पुण्यातून काही भाविक गेले आहेत .आळंदी येथील गजानन महाराज सोनवणे यांच्याबरोबर एका बस मधून ५५ भाविक गेले होते त्यात पुण्यातील धायरी येथील फॉरचून सोसायटी येथील महेश राजाराम भोसले, सुनिता महेश भोसले हे पती-पत्नी आणि महेश भोसले यांची एक बहीण हे यात्रेसाठी गेले आहेत. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना अमरनाथ दर्शन झाले. दर्शन झाल्यानंतर भोसले कुटुंबीयांनी पुण्यात घरी असलेल्या आपल्या स्वप्निल भोसले या मुलाला व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल केला. सर्वजण त्यांच्याशी बोलले आमचे दर्शन झाले असून आम्ही आता खाली उतरत आहेत असे सांगितले.

बोलणे झाल्याच्या पंधरा मिनिटानंतर वडिलांनी मुलाला फोन केला आणि आई सुनीता महेश भोसले (वय-५५,राहणार ,गल्ली क्रमांक,१७, फॉरचून सोसायटी धायरी) आपल्यात राहिली नसल्याचे डबडलेल्या डोळ्यांनी सांगितले. दरड कोसळताना काही दगड डोक्यावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्वप्निलच्या आत्याला एअरलिफ्ट करून खाली आणले आहे. स्वप्निल आणि वैष्णवी वाटवे यांच्याशी संपर्क साधून संकटग्रस्त मदत मागितली, दरम्यान यात्रेसाठी गेलेल्या ५५भाविकांपैकी ५४जणांशी संपर्क झाला. हे सर्व भाविक मिलिटरी कॅम्प मध्ये सुरक्षित असल्याचे माऊली यात्रा कंपनीने सांगितले असल्याचे आर डी सि खराडे यांनी सांगितले. ढग फुटीच्या घटनेनंतर अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. पुण्यातील बाकी सर्व अमरनाथ यात्रेकरुंशी संपर्क झाला असून ते सुखरूप आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com