भरधाव कारच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

भरधाव कारने पादचारी महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने महिलेचा जागीच मृत्यु झाला. ही घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजता म्हाळुंगे-बाणेर रस्त्यावर घडली.

पुणे : भरधाव कारने पादचारी महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने महिलेचा जागीच मृत्यु झाला. ही घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजता म्हाळुंगे-बाणेर रस्त्यावर घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मीराबाई मिश्रीलाल नूकुम (वय 48, रा. संकल्प सोसायटी, बाणेर) असे अपघातात मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे पती मिश्रीलाल नूकुम (वय 49) चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अनोळखी कारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशनावरून विरोधक आक्रमक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पत्नी बाणेरमधील संकल्प सोसायटीत राहतात. शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास त्या म्हाळुंगे-बाणेर रस्त्यावरील परफेक्‍ट स्माईल क्‍लिनिकमध्ये गेल्या होत्या. तेथे पैसे देऊन त्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या शिवांजली सुपर मार्केटकडे पायी येत होत्या. त्यावेळी गणराज चौकाकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये त्या खाली पडून गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर कारचालक महिलेने पोलिसांना माहिती न देता, महिलेला रुग्णालयात न नेता तेथून पळ काढला. दरम्यान, स्थानिक नागरीकांनी त्यांना रुग्णालयात नेले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman dies in road accident in Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: