esakal | महिलेला आधी समाजातून बाहेर काढलं, आता लाथाबुक्क्यांनी मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

nanded crime news

महिलेला आधी समाजातून बाहेर काढलं, आता लाथाबुक्क्यांनी मारहाण

sakal_logo
By
अक्षय साबळे

पुणे : जात पंचायतीने (jat panchayat) समाजातून बहिष्कृत केल्याच्या विरोधात पोलिसांत (police) तक्रार दिली म्हणून एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच तिच्यासह कुटुंबीयांनाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी एका ३४ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ (bharti vidyapeeth) पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून रुपेश प्रेम कुंभार (वय ४०), निखिल सुनील कुंभार (वय २९), प्रेम कुंभार (वय ६०) आणि तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (woman first expelled society now Beaten by batons)

हेही वाचा: जगाकडून आम्हाला धर्मनिरपेक्षता, लोकशाही शिकण्याची गरज नाही - RSS

फिर्यादी महिलेला त्यांच्या समाजाच्या जात पंचायतीने (jat panchayat) समाजातून बहिष्कृत केले होते. त्या विरोधात त्यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तक्रारीत महिलेने आरोपींचे नाव टाकले होते. त्यामुळे आरोपींना ‘त्या तक्रारीत आमचे नाव का टाकले,’असा जाब विचारून या महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर या महिलेचे पती, बहिण आणि आईला जिवे मारण्याची धमकीही दिली.

हेही वाचा: सिद्धू नडणार, कॅप्टन अमरिंद यांची माफी नाही मागणार

याबाबात बोलताना भारती विद्यापीठचे (bharti vidyapeeth) पोलिस सहायक निरीक्षक तानाजी भोगम म्हणाले, 'जात पंचायतीने बहिष्कृत केल्याप्रकरणी एका महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तो गुन्हा सासवड पोलिस (saswad police) ठाण्यात वर्ग झाला आहे. या गुन्ह्यात नाव असल्यामुळे आरोपींनी या महिलेला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.'

loading image