esakal | जगाकडून आम्हाला धर्मनिरपेक्षता, लोकशाही शिकण्याची गरज नाही - RSS
sakal

बोलून बातमी शोधा

जगाकडून आम्हाला धर्मनिरपेक्षता, लोकशाही शिकण्याची गरज नाही - RSS

जगाकडून आम्हाला धर्मनिरपेक्षता, लोकशाही शिकण्याची गरज नाही - RSS

sakal_logo
By
सूरज यादव

संरसंघचालक मोहन भागवत हे दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. याठिकाणी त्यांनी बुधवारी Citizenship Debate Over NRC & CAA: Assam and the Politics of History चे उद्घाटन केले. यानिमित्त गुवाहाटीत आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटलं की, जगाकडून आम्हाला धर्मनिरपेक्षता, सामाजिकता आणि लोकशाही शिकण्याची गरज नाही. आमच्या परंपरेत आणि रक्तात ते आधीपासूनच आहे. आमच्या देशाने त्याची अंमलबजावणी केली आहे आणि अजुनही देशात हे अस्तित्वात आहे.

सीएए एनआरसीमुळे भारतातील मुस्लिमांचे काही नुकसान होणार नाही असे भागवत म्हणाले. त्यांनी म्हटलं की, संविधानात आम्ही म्हटलंय की आम्ही देशातील अल्पसंख्यांकांची काळजी घेऊ. आम्ही हे केलं पण पाकिस्तानने केलं नाही. देशाच्या फाळणीवेळी नेत्यांनी घेतलेला निर्णय जनेतनं मान्य केला होता. त्यामुळे ज्यांना आता कोणी विचारत नाही त्यांची काळजी कोण घेणार? यात त्यांचा काय दोष आहे असा प्रश्नही भागवत यांनी विचारला आहे.

हेही वाचा: UP - माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती गंभीर

सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. त्यानतंर आता नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीवर त्यांनी म्हटलं की, यामुळे कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला त्रास होणार नाही. सीएए आणि एनआरसी यांचा हिंदू-मुस्लिम फूट पाडण्याशी काही संबंध नाही. राजकीय फायद्यासाठी याला धार्मिक रंग दिला जात आहे.

loading image