
पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटना कमी होत नसल्यानं पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. एका तरुणीने मित्राच्या मदतीनं एका तरुणाची हत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. हत्या झालेला तरुण वारंवार त्रास द्यायचा म्हणून तरुणीने मित्राच्या मदतीने त्याची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. दोन्ही आरोपी हे जिम ट्रेनर आहेत. त्यांची जिममध्येच हत्या झालेल्या तरुणाशी ओळख झाली होती.