महिलेचा खून करून जाळण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

वडगाव शेरी (पुणे) : लोहगाव येथील पाटील वस्तीतजवऴच्या शेतात एका अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळुन आला. अज्ञात आरोपीने खुन करून आणि तिच्या शरीराचे तुकडे करून तीला स्प्रेच्या सहाय्याने जाळण्याचा प्रयत्न केल्याचा विमानतळ पोलिसांचा अंदाज आहे.

खुन झालेल्या महिलेचा अर्धवट जळाळेला मृतदेह शेतात पाहून स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी (ता. 10) अज्ञात आरोपीने महिलेचा कोठेतरी खुन करून तीला गाडीत या ठिकाणी आणले. त्यानंतर जाळण्याचा प्रयत्न केला. तीचा उजवा पायही कमरेपासून तोडण्यात आला आहे. तीच्या डाव्या हातावर अंगठ्याजवळ इंग्रजीत एबी आणि उजव्या हातावर आयोध्या असे इंग्रजीत गोंदलेले असून सावळ्या रंगाची महिला पंचवीस ते तीस वयाची आहे. याविषयी काही माहिती असल्यास विमानतळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक संजय नाईक यांनी केले आहे. 

Web Title: a woman murder and try to burn her