नोकरीसाठी तिने दिले एक-दोन लाख नव्हे, तर तब्बल १२ लाख रुपये!

online-cash file pic
online-cash file pic

पुणे - चांगल्या पगाराची नोकरी कोणाला नको असते. त्यातही सध्याच्या कोरोनाच्या काळात अशी नोकरी मिळाली तर! पण अशा चांगल्या नोकरीसाठी तुम्हाला कोणी पैसे भरण्यास सांगितले, तर तुम्ही किती पैसे भराल. तर १०, २० हजारांपासून फार तर एखाद्या लाखापर्यंत. पण एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेने चांगल्या पॅकेजची नोकरी मिळावी, यासाठी एक-दोन लाख नव्हे, तर तब्बल १२ लाख रुपये दिले. तरीही नोकरी मिळाली नाही, अखेर तिने पोलिसात धाव घेऊन १२ लाखाच्या नोकरीची गोष्ट ऐकवली !  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मगरपट्टा सिटीमध्ये राहणारी ४३ वर्षांची वैशाली (नाव बदलले आहे) एका नामांकित आयटी कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी करत आहे. तरीही आणखी चांगल्या पॅकेजची नोकरी मिळावी, अशी तिची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. त्यासाठी तिने नोकरीशी संबंधित विविध प्रकारच्या वेबसाइटवर आपली वैयक्तिक माहिती दिली होती. त्यानुसार एका नोकरी देणाऱ्या कंपनीतील काही लोकांचे फोन आले. रोहित गुप्ता, श्रुती नायर, प्रतीक वर्मा, सुधांशू मिश्रा अशा वेगवेगळ्या नावांच्या व्यक्तींनी आपण संबंधित कंपनीचे प्रतिनिधी बोलत असून त्यांना चांगल्या पॅकेजची नोकरी देऊ असे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी प्रक्रिया शुल्क, अर्ज शुल्कासाठी ११ लाख ९९ हजार रुपये त्यांनी ऑनलाइन माध्यमाद्वारे भरण्यास सांगितले. त्यानुसार, वैशालीनेही चांगल्या पॅकेजची नोकरी मिळत असल्याचे पाहून तेवढी रक्कम भरली. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तींना वेळोवेळी फोन करून नोकरीबाबत विचारणा केली, मात्र त्यांनी नोकरी देण्याबाबत टाळाटाळ करण्यास सुरवात केली. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी त्यांचे तीन लाख ३९ हजार रुपये दिले. तर उर्वरित आठ लाख ६० हजार रुपये मात्र दिले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com