Pune Crime : पुण्यात डॉक्टरकडून रुग्ण महिलेवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime
Pune Crimeesakal

Pune News : पुणे शहरातील कात्रज भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका डॉक्टरने रुग्ण महिलेवर अत्याचार केला असून पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेतलं आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांमध्ये पीडितेने तक्रार दिली आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी डॉक्टरचे कात्रज भागात क्लिनिक आहे. याठिकाणी पीडित रुग्ण महिला तपासणीसाठी गेली होती.

Pune Crime
Brij Bhushan Singh: सुप्रीम कोर्टाकडून FIRचे आदेश; बृजभूषण सिंहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

याच वेळी त्यांची ओळख डाॅक्टरशी झाली. महिलेचा मोबाईल क्रमांक डॉक्टरने घेतला. त्यानंतर आरोपीने महिलेला पुन्हा रुग्णालयात बोलावले आणि धमकावून बलात्कार केला.

भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतलं आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com