तोंडओळख असलेल्या तरुणासोबत जेजुरीला जाणं महिलेला पडलं महागात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

जेजूरी या ठिकाणाहून दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे  येताना योगेश पाटील यांनी लघुशंकेसाठी आपली गाडी सासवड - पुणे रोडवरील एका हॉटेल शेजारी थांबवली. दरम्यान गाडी थांबताच, पाटील याने जवळकर यांना गाडीतून खाली उतरवले.

लोणी काळभोर (पुणे) : सोलापूर जिल्हातील एका महिला शिक्षिकेला केवळ जुजबी तोंड ओळख असलेल्या इसमाबरोबर फिरणे चांगलेच अंगलट आले आहे. योगेश पाटील नामक इसमाने एका शिक्षक महिलेचे ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम पळवून नेल्याची घटना मंगळवारी (ता. २६)  पुणे - सासवड रोडवरील उरुळी देवाची ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सुरेखा चंद्रकांत जवळकर (वय - ४८ रा. न्यू पाच्छा पेठ, अशोक चौक, सोलापूर) हे फसवणूक झालेल्या महिला शिक्षिकेचे नाव असून, या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी योगेश पाटील (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) या इसमाच्या विरोधात फसवणुकीचा व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा जवळकर या सोलापूर जिल्हातील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या दिड वर्षापुर्वी कामानिमित्त करमाळा येथे गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांची योगेश पाटील यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांची समोरासमोर भेट झाली नसली तरी त्यांच्यात काही वेळा फोनवरुन संभाषण मात्र झाले होते. दरम्यान मंगळवारी (ता. ता. 26) शैक्षणिक काम असल्याने सुरेखा जवळकर पुण्यात आल्या होत्या. ही बाब योगेश पाटील यांना समजताच, त्याने  त्यांनी जेजुरी फिरायला येण्याची विनंती केली. त्यानंतर दोघेजण जेजुरी येथे गेले.

'केंद्रातील मंत्र्यांनी भालेरावांच्या कविता ऐकाव्यात'; शिक्षणमंत्र्यांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला!

जेजूरी या ठिकाणाहून दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे  येताना योगेश पाटील यांनी लघुशंकेसाठी आपली गाडी सासवड - पुणे रोडवरील एका हॉटेल शेजारी थांबवली. दरम्यान, गाडी थांबताच, पाटील याने जवळकर यांना गाडीतून खाली उतरवले. जवळकर खाली उतरताच पाटील याने आपल्या ताब्यातील चारचाकी गाडी घेऊन पुण्याकडे निघून गेला. जवळकर यांनी गाडीतून उतरताना आपली पर्स गाडीतच ठेवल्याने, पर्समधील ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम पाटीलने पळवून नेले.

गाडी जात असल्याचे लक्षात येताच, जवळकर यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत पाटील याची गाडी दिसेनाशी झाली होती. त्यानंतर पाटील याने मोबाईल फोनही बंद केल्याचे जवळकर यांच्या लक्षात आले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच, जवळकर यांनी लोणी काळभोर पोलिसात पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. 

पोलिसाच्या अंगावर गाडी घातली अन् ठोकली धूम; येरवड्यातील प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A woman from Solapur found it expensive to travel to Pune with a young man with a familiar face