Fri, March 24, 2023

Crime News : महिलेकडून शोरूममधील दागिन्यांवर डल्ला
Published on : 7 March 2023, 4:39 pm
पुणे : निळ्या रंगाचा टॉप, जिन्स पॅंट असा वेष परिधान करून आलेल्या एका महिलेने मॉलमधील शोरूममधून सोन्याचे दागिने लंपास केले. विमाननगर येथील फिनिक्स मार्केट सिटीमधील ब्लू स्टोन शोरूमध्ये हा प्रकार घडला.
याप्रकरणी शोरूमचे व्यवस्थापक राहुल चौरसिया (वय ३०, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून विमानतळ पोलिस ठाण्यात एका ३५ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या शोरूममध्ये सोन्याचे, हिऱ्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट असे विविध स्वरूपाचे दागिने काचेच्या डिस्प्लेमध्ये विक्रीसाठी ठेवलेले होते. या अनोळखी महिलेने विक्रेत्याची नजर चुकवून सोन्याचे दोन लाख ८२ हजार रुपये किमतीचे ब्रेसलेट चोरून नेले.