शेजाऱ्यांच्या भांडणाला कंटाळून महिलेची आत्महत्या; पाच जणांना अटक

शेजाऱ्यांच्या भांडणाला कंटाळून महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली; नारायणगाव (खोडद रोड) येथील धक्कादायक घटना
Anita Padwal
Anita PadwalSakal

नारायणगाव - शेजाऱ्यांच्या भांडणाला कंटाळून महिलेने (Women) विहिरीत उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसांनी नारायणगाव (खोडद रोड) येथील अष्टविनायक रेसिडेन्सी सोसायटीतील एकाच कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा (Crime) दाखल केला आहे. आरोपींना आज सायंकाळी अटक केली आहे. अशी माहिती फौजदार गुलाबराव हिंगे पाटील यांनी दिली. (Woman Suicide after Quarreling with Neighbors Crime)

अनिता संभाजी पडवळ (राहणार अष्टविनायक रेसिडेन्सी) या महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसांनी राहुल गंगाधर दुशिंग, रुपाली राहुल दुशिंग, प्रविण गंगाधर दुशिंग, राजश्री प्रविण दुशिंग, गंगाधर भागाजी दुशिंग (सर्व राहणार अष्टविनायक रेसिडेन्सी खोडद रोड नारायणगाव,तालुका जुन्नर) एकाच कुटुंबातील पाच जणांना अटक आहे.

Anita Padwal
गारवा हॉटेल मालक खून प्रकरण; आरोपीच्या पत्नीला या कारणामुळे अटक

या बाबत फौजदार हिंगे पाटील म्हणाले आरोपी व अनिता पडवळ हे अष्टविनायक रेसिडेन्सी सोसायटीत शेजारी राहण्यास होते. आरोपी हे अनिता पडवळ यांना वेळोवेळी टोमणे मारूण मानसिक त्रास देत होते. भांडणातून आरोपींनी अनिता यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहुन अनिता यांनी पाटे खैरे मळा येथील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आज दुपारी त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. याप्रकरणी विशाल संभाजी पडवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास फौजदार हिंगे पाटील करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com