पुणे : शिवीगाळीचा केल्याचा जाब विचारल्याने महिलेवर कोयत्याने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
पुणे : शिवीगाळीचा केल्याचा जाब विचारल्याने महिलेवर कोयत्याने वार

पुणे : शिवीगाळीचा केल्याचा जाब विचारल्याने महिलेवर कोयत्याने वार

पुणे : वस्तीत राहणाऱ्या नागरीकांना विनाकारण शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेवर तरुणाने कोयत्याने वार केले. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. हि घटना मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता वाकडेवाडी येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीत घडली. खडकी पोलिसांनी आरोपीला अटक केली. ताहिर अजिज इराणी (वय 33, रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी, वाकडेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.(woman was stabbed with a scythe)

हेही वाचा: पुणे : सराईत गुन्हेगाराकडून घरफोडीच्या तब्बल 30 घटना उघड

याप्रकरणी राबिया इराणी (वय 28 ) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राबिया व ताहिर हे दोघेही पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये राहायला आहेत. मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता ताहिर वस्तीमधील नागरीकांना विनाकारण शिवीगाळ करीत होता. त्यामुळे राबिया यांनी त्याला रहिवासी व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ का करतोस, अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने फिर्यादीस शिवीगाळ करुन त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने डाव्या हाताच्या मनगटावर वार केले. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरीकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक वैशाली सुळ करीत आहेत.(Pune Crime News)

Web Title: Woman Was Stabbed With A Scythe When Asked To Respond To The Accused

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top