
रविवारी पहाटे पाच वाजता बारामतीतील भिगवण चौकातून प्रारंभ झालेली ही रॅली गोखळी-बरड-नातेपुते-माळशिरस-वेळापूर मार्गे पंढरपूरपर्यंत गेली.
बारामती : येथील बारामती सायकल क्लबच्या महिला सदस्यांनी नुकताच रविवार (ता. 17 ) बारामती ते पंढरपूर असा 111 किमी सायकलप्रवास केला. यातही वैशिष्टय म्हणजे या सर्वांनी नऊवारी साडी घालून हा सायकल प्रवास केला. अकरा वर्षांच्या मुलीपासून साठ वर्षीय महिलांनी मोठ्या उत्साहाने या सायकल प्रवासात सहभाग घेतला.
पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर 'राडा'; दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले
दरम्यान, या सायकल रॅलीमध्ये लता विजय दराडे, श्रध्दा विजय दराडे, जान्हवी नीलेश घोडके, ऋतुजा राजेंद्र भुंजे, शुभश्री सुभाष चौधर, मंगल राऊत, रुपाली विनायक तारु, साक्षी विनायक तारु, समीक्षा विनायक तारु, अनुष्का राऊत, अंकिता मुकुंद जाधव, द्वारका कैलास कारंडे, अनिता आटोळे यांनी सहभाग नोंदविला.
या महिला सदस्यांना पाठिंबा देण्यासाठी विजय संभाजी दराडे, मच्छिंद्र आटोळे, सुभाष चौधर, श्रेयस विजय दराडे, कैलास कारंडे, रावबा गवंड आदी सहभागी झाले होते.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रविवारी पहाटे पाच वाजता बारामतीतील भिगवण चौकातून प्रारंभ झालेली ही रॅली गोखळी-बरड-नातेपुते-माळशिरस-वेळापूर मार्गे पंढरपूरपर्यंत गेली. दुपारी दोन वाजता रॅली पंढरपूरला पोहोचली. प्रवासात अनेक ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले.
धनंजय मुंडे Genuine माणूस, पक्ष योग्य निर्णय घेईल : रोहित पवार
पंढरपूर येथील आमदार परिचारक कुटुंबाकडून या महिलांचा सत्कार करण्यात आला. या सायकल रॅलीची प्रेरणा बारामती सायकल क्लबच्या लता विजय दराडे आणि श्रद्धा विजय दराडे या माय-लेकींनी एक जानेवारी रोजी बारामती-आळंदी पूर्ण केलेल्या सायकल सफरीतून मिळालेली होती. दरम्यान या पुढील काळातही महिलांच्या सायकल सफरींचे आयोजन केले जाणार आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)