पोलिस - महिलेचा "सब गोलमाल'

Police
Police

बारामती शहर/लोणी काळभोर (पुणे) : पोलिसाकडेेच तीस लाखांची खंडणी मागणाऱ्या एका महिलेविरुद्ध बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या बाजूला संबंधित पोलिसानेच लग्नाचे आमिष दाखवून, बलात्कार केल्याच्या महिलेच्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

""माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, तू सोबत राहिला नाहीस तर आत्महत्या करेन'', अशी धमकी देत खंडणी मागितल्याची फिर्याद पोलिस कर्मचारी संजय बबन कोठावळे (मूळ रा. जेऊर दहिगाव रस्ता, जेऊर, ता. करमाळा, सध्या रा. बारामती) यांनी दिली आहे.
पुण्यातील हडपसर येथील ससाणेनगरमध्ये राहणाऱ्या महिलेने आत्महत्येची धमकी देत खंडणीची मागणी केल्याचे कोठावळे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. सप्टेंबर 2019 ते 16 ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत फिर्यादीच्या मूळ गावी, तसेच बारामतीत ही घटना घडल्याचे म्हटले आहे. आरोपी महिला हडपसरमधील ससाणेनगर येथे राहत असली, तरी तीही मूळची करमाळा तालुक्‍यातील शेलगाव वांगी येथे वास्तव्यास असते. मोबाईलवरून बोलून प्रेम असल्याचे सांगत लग्नाची मागणी केली. ""तुझ्यासाठी मी माझ्या नवऱ्याला सोडून दिले आहे, तू लग्न नाही केलेस तर शीर कापून किंवा विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करेन'', असे धमकावत तसे फोटोही व्हॉट्‌सऍपवर टाकल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. आपण दोघे एका फ्लॅटमध्ये राहू, असे म्हणत फ्लॅट घेण्यासाठी 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, लग्नाचे आमिष दाखवून लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध लॉजवर नेऊन बलात्कार केला. महिलेने लग्नाचा तगादा लावताच, वडील आजारी असल्याचे खोटे कारण सांगून संबंधित महिलेला गावाकडील घरी बोलावले व तेथे तिला बेदम मारहाण केल्याप्रकरणी संजय कोठावळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय कोठावळे व संबंधित महिला काही वर्षापूर्वी करमाळा तालुक्‍यातील एका शाळेत शिक्षण घेत असल्याने, दोघेही एकमेकांना ओळखत होते. या ओळखीमधूनच कोठावळे याने पीडित महिलेला फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. संबंधित महिलेनेही संजय कोठावळे हा गावाकडील व पूर्वीची तोंडओळख असल्याने, कोठावळे याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. संजय कोठावळे व पीडित महिलाही पुण्यात राहत असल्याने, फेसबुक व नंतर प्रत्यक्षात दोघांचीही ओळख वाढली व भेटीगाठी सुरू झाल्या. त्यातूनच कोठावळे याने संबंधित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून, तिच्यावर वारंवार बलात्कार केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोठावळे याने वडील आजारी असल्याचे कारण सांगून, संबंधित महिलेला माढा तालुक्‍यातील टेंभुर्णी येथे बोलावून घेतले. संबंधित महिला कोठावळे याच्या घरी गेली असता, घरातील तिला मारहाण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com