पोलिसाला म्हणाली, माझं तुझ्यावर प्रेम, आता दे 30 लाख...

police
police

बारामती शहर  : पोलिसालाच तीस लाखांची खंडणी मागणाऱ्या एका युवतीविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, तु सोबत राहिला नाहीस तर आत्महत्या करेन अशी धमकी देत खंडणी मागितल्याची फिर्याद पोलिस कर्मचारी संजय बबन कोठावळे (मूळ रा. जेऊर दहीगाव रस्ता, जेऊर, ता. करमाळा, सध्या रा. बारामती) यांनी दिली आहे. 

पुण्यातील हडपसर येथील ससाणेनगरमध्ये राहणा-या महिलेने आत्महत्येची धमकी देत खंडणीची मागणी केल्याचे कोठावळे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. सप्टेंबर 2019 ते 16 ऑक्टोबर 2019 या कालावधीत फिर्यादीच्या मूळ गावी तसेच बारामतीत ही घटना घडल्याचे म्हटले आहे. आरोपी महिला हडपसरमधील ससाणेनगर येथे राहत असली तरी ती ही मूळची करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथे वास्तव्यास असते. 

मोबाईलवरुन बोलून प्रेम असल्याचे सांगत लग्नाची मागणी केली, तुझ्यासाठी मी माझ्या नव-याला सोडून दिले आहे, तु लग्न नाही केलेस तर शिर कापून किंवाविषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करेन असे धमकावत तसे फोटोही व्हॉटसअँपवर टाकल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. 

आपण दोघे एका फ्लॅटमध्ये राहू असे म्हणत फ्लॅट घेण्यासाठी 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com