मुलीला विष देऊन आईची आत्महत्या

मुलीला विष देऊन आईची आत्महत्या

वडगाव निंबाळकर : आजाराला कंटाळलेल्या महिलेने आपल्या १० वर्षीय मुलीला विष देऊन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पणदरे मानाजीनगर येथे शनिवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली.

सुरेखा नवनाथ जाधव असे गळफास घेतलेल्या मातेचे नाव असून, साक्षी नवनाथ जाधव (वय १०) असे विष पिल्याने मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे. सुरेखा लग्नानंतर काही दिवसातच पतीपासून वेगळी झाली. आपल्या मुलीसह माहेरी राहत होती. शुक्रवारी घरातील सर्व बाहेर असल्याचे निमित्त साधुन राहत्या घरातील एका खोलीत माय लेकर रात्री झोपली होती.

घरातील लोक बाहेरून आली त्यावेळी दोघेही झोपले होते. रात्रीच्या वेळी मुलीला पाण्यामध्ये विष देउन आई सुरेखाने पहिल्यांदा मारले. यानंतर स्वतः छताच्या अँगलला दोरी बांधुन गळफास घेतला. सकाळी नेहमीप्रमाणे घरातील सर्व उठले तरी त्यांच्या खोलीतून काही आवाज येत नसल्याचे पाहून दार वाजवले पण प्रतिसाद आला नाही.

दरवाजा काढून आत पाहिले असता मुलगी मृत अवस्थेत तर आईने गळफास घेतल्याचे दिसून आले. शेजारी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, की मी कॅन्सरच्या आजाराला कंटाळले आहे. माझ्या पश्चात माझ्या मुलीचे हाल होऊ नयेत. यासाठी आम्ही दोघेही देवाघरी जात आहे.

याबाबत कोणालाही दोषी ठरवू नये. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी विषारी औषधाची बाटली आणि चिठ्ठी आढळून आली. याबाबत सचिन बाबुराव शिंदे यांनी पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे. मयत सुरेखावर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. तपास वडगाव निंबाळकर पोलिस ठाणेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com