पाण्याच्या टाकीमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

कात्रज - आंबेगाव पठार परिसरातील सर्व्हे क्रमांक सोळा येथील शिवनेरी अपार्टमेंटच्या पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत शनिवारी सकाळी महिलेचा मृतदेह आढळला. सुनमैया गणेश तमांग (वय ३५) असे तिचे नाव आहे. तिने आत्महत्या केली की घातपात याबाबत भारती विद्यापीठ पोलिस तपास करीत आहेत.

शिवनेरी सोसायटीतील सदस्य राऊत हे आज सकाळी अकराच्या सुमारास इमारतीवरील टाकीत पाणी चढवण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांनी टाकीचे झाकण उघडले असता, महिलेचा मृतदेह असल्याचे आढळले. त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले. अग्निशामकचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढला. तो तमांग यांचा मृतदेह असल्याची खात्री झाली. सुनमैया यांना आधी जिवे मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पाण्याच्या टाकीत टाकले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुनमैया यांचे कुटुंब या सदनिकेत दोन वर्षांपासून राहते. सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता, कॅमेरे बंद असल्याचे निदर्शनास आले. 

Web Title: Women Deathbody receive in Water Tank Crime