Hadapsar News : कार पार्किंग करताना झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू; तर एक महिला जखमी

हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात प्राचार्यांची कार पार्किंग करीत असताना कर्मचाऱ्याकडून झालेल्या अपघातात एका महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Shalan Shelar
Shalan Shelarsakal

हडपसर - येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात प्राचार्यांची कार पार्किंग करीत असताना कर्मचाऱ्याकडून झालेल्या अपघातात एका महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, दुसरी प्राध्यापक महिला जखमी झाली आहे. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

शालन दत्तात्रय शेलार (वय ५०, रा. १५ नंबर, हडपसर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. जखमी महिला प्रा. इरफाना शब्बीर मुल्ला (वय-३२, रा. गुलामअलीनगर, हांडेवाडी रोड, हडपसर) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे कारने मुख्य प्रवेशद्वारातून आपल्या कार्यालयासमोर आले. तेथे कारमधून उतरून त्यांनी महाविद्यालयातील सेवक राहुल जाधव याच्याकडे कार पार्किंग करण्यासाठी दिली. त्यानंतर शिपाई सीमा देशमुख हिने राहूलकडून चावी घेऊन महाविद्यालयाच्या मैदानात स्वत: कार चालवण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी नियंत्रण सुटल्याने समोर चालत असलेल्या प्रा. मुल्ला यांना धडक देवून कार सुसाट वेगात महाविद्यालयाच्या जिन्याजवळील वॉशबेसीनच्या भिंतीला धडकली. त्यावेळी बेसीनवर कर्मचारी शालन शेलार हात धूवत होत्या. त्यांच्या पाठिमागून कमरेखाली कारची धडक बसल्याने तीच्या दोन्हीही पायांचा चेंदामेंदा झाला.

दोघींनाही तात्काळ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शालन शेलार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. हडपसर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

शेलार व ज्यांच्याकडून अपघात झाला त्या देशमुख या एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. महाविद्यालयात कोणत्याही कार्यक्रमात त्या हिरिरीने सहभागी होत. सांस्कृतिक कार्यक्रमातूनही त्या उत्साहाने सभागी होत. त्यामुळे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांमध्ये त्या चांगल्या परिचित होत्या. त्यांच्या अपघाती निधनाने सर्वांकडून हळहळ व्यक्त होत होती. त्यांच्या मागे पती व दोन मुले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com