पुणे : चाकणमध्ये रस्त्याच्या वादातून महिलेचा खून

पुणे : चाकणमध्ये रस्त्याच्या वादातून महिलेचा खून

पिंपरी चिंचवड - घरासमोरील रस्त्याच्या वादातून एका महिलेचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज चाकणच्या मेदनकरवाडी येथे घडली. मृत महिला घराबाहेर भांडी घासत असताना चार जणांनी तिच्यावर हल्ला करून तिचा खून केला. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्पना विक्रम शितोळे वय-45 रा. मेदनकरवाडी असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणात अनिल मधुकर हेंद्रे, सुवर्णा हेंद्रे, सिद्धेश हेंद्रे आणि सुशीला शांताराम भुसारे सर्व रा. मेदनकरवाडी यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रम नारायण शितोळे वय-48 यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पुढील तपास चाकण पोलिस करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com