पुणे - सांगवीत महिला रॅलीने स्री शक्तीचा जागर

रमेश मोरे
बुधवार, 4 एप्रिल 2018

जुनी सांगवी (पुणे) : सांगवीतील मातोश्री महिला मंच व सांगवी प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या सौजन्याने  महिलांसाठी सामाजिक, सांस्कृतिक कार्य करणाऱ्या महिलांनी विविध वेशभूषा परिधान करून जुनी सांगवी परिसरात रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीत सहभागी महिलांनी देशातील कर्तृत्वान महिलांची वेशभूषा व केशरी फेटे परिधान केले होते.

आधुनिकते बरोबरच परंपरेची कास धरून, संस्काराची शिदोरी घेऊन, ती प्रत्येक कुटुंबात आणि त्याबरोबरच संपूर्ण समाजात रुजवण्यासाठी. लेक वाचवा लेक शिकवा, नेत्रदान, रक्तदान, अवयवदान श्रेष्ठदान, प्लास्टिकची घडण गाईगुरांचे मरण, विज्ञानावर ठेवू श्रद्धा दूर करू अंधश्रद्धा अशा घोषणा दिल्या.

यावेळी राजश्री पोटे यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. रॅली यशस्वितेसाठी रजनी पांडे, प्रियंका साळुंखे, वैष्णवी बानूबकोडे, अर्चना वैराळे, सुनीता कुंजीर, नंदा श्रीखंडे, कोमल गौडळकर, उषा गायकवाड, वासंती घराळ, रेणुका कुलकर्णी, सारिका कांबळे, कोमल दवे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेखा साळुंके यांनी केले.

Web Title: women rally in sangavi pune

टॅग्स