पुणे : घरफोड्या करणारी महिला गजाआड 

3arrested_54.jpg
3arrested_54.jpg

पुणे : कचरा उचलण्याच्या बहाण्याने बैठ्या घरांमध्ये शिरून किंवा रात्रीच्या वेळी बंद घराच्या खिडकीचे गज कापून एक महिला चोरी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनीही सापळा रचून या महिलेस अटक केली. त्या वेळी तिने आतापर्यंत घरफोडीचे 12 गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून दोन लाख 33 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. 

लक्ष्मी संतोष अवघडे ऊर्फ लक्ष्मी विक्रम भिसे (वय 31, रा. नावररस्ता, पाटण, सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित महिला आरोपीचे नाव आहे. पोलिस चेतन गोरे व फरांदे यांना एक महिला शहराच्या वेगवेगळ्या भागांत घरफोड्या करीत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार युनिट दोनचे पोलिस निरीक्षक गजानन पवार, जयवंत जाधव, लक्ष्मण ढेंगळे, अनिल उसुलकर यांच्या पथकाने पाच फेब्रुवारीला सापळा रचून लक्ष्मी हिला अटक केली. 

पोलिसांनी संबंधित तिची चौकशी केली असता, तिने घरफोडीचे बारा गुन्हे केल्याचे कबूल केले. तिच्याकडून सोने व अन्य वस्तू, असा एकूण अडीच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी ही कचरा वेचण्याच्या बहाण्याने बैठी घरे पाहायची. त्यानंतर उघड्या असणाऱ्या घरात घुसून किंवा रात्री बंद घरांच्या खिडकीचे गज कापून दागिने व पैशांची चोरी करत असे. 

प्रवाशांची लूट करणाऱ्या महिलांना अटक 
पीएमपी बस, एसटीमधील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे पाकीट, पर्स, सोन्या-चांदीचे दागिने व पैसे चोरणाऱ्या तिन महिलांना युनिट दोनच्या पथकाने अटक केली. शांता राजू जाधव (वय 50, रा. मुंढवा), चंद्रभागा बजेंत्री ऊर्फ गायकवाड (वय 45), सुचित्रा ज्ञानेश्‍वर जाधव (वय 30) असे अटक केलेल्या संशियत आरोपींची नावे आहेत. पोलिस दिनेश गंडाकुश यांना बसमधील चोऱ्या करणाऱ्या महिलांबाबतची खबर मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचून या तिघींना अटक केली. तपासामध्ये तिघींनी आतापर्यंत पाच गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com