पळून गेल्याने वाचले चार मुलांचे प्राण

Mule
Mule

मंचर (पुणे) : पतीकडून होत असलेल्या छळाला व मारहाणीला कंटाळून महिलेने चार मुलांसह चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथे घोड नदीच्या पात्रात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या वेळी मुलांनी पळ काढला; पण महिलेने नदीपात्रात उडी टाकली. हे दृश्‍य पाहून मासेमारी करणाऱ्या ठाकर समाजातील तरुणांनी तिला पाण्याबाहेर काढले. तिच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी (ता. 24) सदर घटना घडली.

लता सुनील जाधव (मूळ गाव भूम-परांडा, सध्या रा. मंचर- इंदिरानगर, ता. आंबेगाव) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचे नाव आहे. सुनील जाधव, पत्नी लता यांच्यासमवेत चार मुले इंदिरानगर येथे राहतात. पती सुनीलचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून वारंवार भांडण होत होती. वारंवार होणाऱ्या भांडणामुळे लता भाऊ नितीन सुरेश मोहिते यांच्यासोबत मोरडेवाडी-मंचर येथे राहत होती. 15 दिवसांपूर्वी सुनीलने लताला आपण पुन्हा भांडण करायचे नाही, तुला व्यवस्थित नांदवितो, असे सांगून इंदिरानगर येथे घरी नेले. सोमवारी (ता. 23) रात्री सुनील व लता यांच्यात कडाक्‍याचे भांडण झाले. यामध्ये लता यांना मारहाण केली. मंगळवारी लता चार मुलांसमवेत चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चांडोली खुर्द येथील घोड नदीपात्रात आत्महत्या करण्यासाठी गेले; पण मुले घाबरल्याने त्यांनी तेथून पळ काढला. लता हिने घोड नदीत उडी टाकली. हे पाहून ठाकर समाजातील मच्छीमारीसाठी आलेल्या तरुणांनी लता हिला बाहेर काढले. स्थानिक ग्रामस्थांनी लताला रुग्णालयातून मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात मंचर पोलिस ठाण्यात सुनील जाधव यांच्याविरोधात फिर्याद देणार असल्याचे नितीन सुरेश मोहिते यांनी सांगितले.

दरम्यान, मंचर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी या घटनेची दाखल घेतली असून लता जाधव हिचा जबाब घेण्याचे काम सुरू केले आहे. दोषीवर योग्य कारवाई करू, असे खराडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com