Vidhan Sabha 2019 : निवडणुकीवर ‘कंट्रोल’ महिलांचा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.

विधानसभा 2019 
पिंपरी - शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे तीनही मतदारसंघांतील निवडणुकीची सर्व प्रक्रिया त्यांच्या नियंत्रणाखाली पार पडणार आहे. त्याबाबतची लगबग सोमवारी (ता. २३) बघायला मिळाली.

पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निवडणूक विषयक कामांसाठी नियुक्त झालेले अन्य आस्थापनांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोमवारी घेतले. आचारसंहिता पालन, मतदारयादी असे कक्ष स्थापन करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढावा, मतदारांची सोय व्हावी यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार इमारतींच्या तळमजल्यावरच मतदान केंद्र असतील. प्रत्येक केंद्रासाठी एक मतदान केंद्रप्रमुख, तीन अधिकारी, एक मदतनीस व एक पोलिस यांची नियुक्ती केली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र असेल. तेथील अधिकारी व कर्मचारी महिला असतील.

आज शेवटची संधी
मतदार नोंदणी मोहिमेनंतर ३१ ऑगस्ट रोजी अंतिम मतदारयादी जाहीर केली. मात्र, मंगळवारपर्यंत (ता. २४) मतदार यादीत नाव नोंदविता येणार असल्याने त्यात पात्र ठरलेल्यांना मतदान करता येणार आहे. त्यामुळे मतदार संख्येत वाढ होईल. आतापर्यंत ९९ टक्के मतदारांना ओळखपत्रांचे वाटप झाले आहे. उर्वरित व नवीन नोंदणी केलेल्यांना ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात ओळखपत्रांचे वाटप होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Womens control over elections