पुण्याचा तरुण ठरला, जगातली सर्वोत्तम आई!

टीम ई-सकाळ
Sunday, 8 March 2020

आदित्य हा सध्या पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करतो आहे आणि त्यानं अवनिश नावाच्या मुलाला दत्तक घेतलंय.

पुणे : पुण्यातला एक तरुण जगातील सर्वोत्तम आई ठरलाय. तरुण सर्वोत्तम आई कसा ठरेल? असा प्रश्न तुमच्यापुढं पडला असले, काही तरी चुकलं असेल, असं वाटेलही तुम्हाला पण, हे खरं आहे. एक तरुण सर्वोत्तम आई ठरलाय. त्या तरुणाचं नाव आदित्य तिवारी आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तान आदित्यचा सन्मान करण्यात आलाय. एएनआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं एनडीटीव्हीनं याबाबतची बातमी प्रसिद्ध केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय आहे आदित्य अवनिशची गोष्ट?
आदित्य हा सध्या पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करतो आहे आणि त्यानं अवनिश वानाच्या मुलाला दत्तक घेतलंय. अवनिश आहे, स्पेशल चाईल्ड अर्थात गतीमंद आहे. आदित्य त्याचा सिंगर पॅरेंट आहे. आदित्य अविवाहित असून, तो अवनिशची उत्तम देखभाल करतो. आदित्यच्या या निर्णयाची दखल, संयुक्त राष्ट्रांकडूनही घेण्यात आली होती. आदित्य सध्या गतीमंद मुलांच्या पालकांना त्यांच्या गरजांनुसार प्रशिक्षण देण्याचं कामही करतो. त्यामुळं संयुक्त राष्ट्रांकडून त्याला एका परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. अवनिशसोबतच्या नात्याबाबत आदित्य म्हणाला, 'मला तब्बल सहा महिन्यांच्या संघर्षानंतर 1 जानेवारी 2016 रोजी अवनिशची जबाबदारी मिळाली. त्यानंतर आमच्या दोघांचा आव्हानात्मक प्रवास सुरू झाला. अवनिश हे मला परमेश्वराकडून मिळालेले सर्वोत्तम गिफ्ट आहे. मी स्वतःला कधीच एक उत्तम बाप किंवा आई बनवण्याचा प्रयत्न केला नाही. मी केवळ चांगला पालक आणि एक माणूस होण्याचा प्रयत्न केला.'

आणखी वाचा - सयाजी शिंदे धावले वणवा विझवायला; व्हिडिओ व्हायरल

अवनिशने मला उत्तम पालक कसं व्हावं, हे शिकवलं. एक महिलाच मुलाचं चागलं पालन-पोषण करू शकते, हा एक पारंपरिक गैरसमज असल्यामुळं मला अवनिशला दत्तक घेताना प्रचंड त्रास झाला. या सगळ्यातून आनंदची ही गोष्ट की, अवनिशनं मला पालक म्हणून स्वीकारलं आहे.
- आदित्य तिवारी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: womens day pune based engineer got best mother in the world award