महिलांच्या अपहरणाचे गुन्हे दुप्पट 

उत्तम कुटे - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 3 डिसेंबर 2016

पिंपरी - राज्यातील गुन्ह्यांत 2014 च्या तुलनेत 2015 मध्ये सव्वादहा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. त्यातही महिलांच्या गुन्ह्यांतील प्रचंड वाढ ही चिंतेची बाब झाली असून, महिलांचे अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांत तब्बल शंभर टक्के वाढ झाली आहे. मालमत्तेच्या तुलनेत हिंसात्मक गुन्ह्यांत पाचपटीने झालेली वाढ आव्हानात्मक असल्याचे निरीक्षण "सीआयडी'च्या (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) महाराष्ट्रातील गुन्हे 2015 या अहवालात नोंदविले आहे. रस्त्यांवरील वाढते अपघात आणि मृत्यू ही गंभीर बाब असल्याचे मतही त्यात व्यक्त केले आहे.

पिंपरी - राज्यातील गुन्ह्यांत 2014 च्या तुलनेत 2015 मध्ये सव्वादहा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. त्यातही महिलांच्या गुन्ह्यांतील प्रचंड वाढ ही चिंतेची बाब झाली असून, महिलांचे अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांत तब्बल शंभर टक्के वाढ झाली आहे. मालमत्तेच्या तुलनेत हिंसात्मक गुन्ह्यांत पाचपटीने झालेली वाढ आव्हानात्मक असल्याचे निरीक्षण "सीआयडी'च्या (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) महाराष्ट्रातील गुन्हे 2015 या अहवालात नोंदविले आहे. रस्त्यांवरील वाढते अपघात आणि मृत्यू ही गंभीर बाब असल्याचे मतही त्यात व्यक्त केले आहे. गुन्हेगारीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

राज्यातील गुन्हेगारी प्रवाहाचे विश्‍लेषण, नवीन स्वरूप, त्यातील वाढ आणि घट नोंदविणारा हा अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. 2015 च्या या अहवालाचे प्रकाशन नुकतेच पुणे येथील सीआयडीच्या मुख्यालयात पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्या हस्ते व सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजयकुमार यांच्या उपस्थितीत झाले. 

2014 च्या तुलनेत गत वर्षी मालमत्ताविषयक गुन्ह्यांत 2.40 टक्के, तर हिंसामय गुन्ह्यांत 14.48 टक्‍क्‍यांनी राज्यात वाढ झाली आहे. दुसरीकडे मालमत्तेचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अवघे 32.6 टक्के आहे, तर हस्तगत करण्यात मालमत्तेचे प्रमाण अवघे 5.12 टक्‍के आहे. आर्थिक गुन्ह्यांत 16.69 टक्‍क्‍यांनी झालेली वाढ चिंतेची बाब असल्याचे नमूद केले आहे. एक लाख लोकसंख्येमागे हिंसेचे 39 गुन्हे असे प्रमाण आहे. हे गुन्हे राज्याची राजधानी मुंबईपेक्षा (38.85) ठाणे येथे (60.21) अधिक घडले आहेत. हा टक्का राज्यात सर्वाधिक आहे, तर पुणे शहर हिंसामय गुन्ह्यांत राज्यात पाचव्या स्थानी असून, तेथील या गुन्ह्यांत 42.18 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 

Web Title: women's kidnapping cases