सोनवडी सुपेत पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर महिलांचा हंडा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

गावात पाणी नसल्यामुळे महिलांना आज ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. चार दिवसात पाण्याचे टॅंकर सुरु नाही झाले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे इशारा यावेळी महिलांनी दिला. 

उंडवडी: सोनवडी सुपे (ता. बारामती) येथे अद्याप पाऊस नसल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ टॅंकर मिळावेत, या मागणीसाठी आज (मंगळवारी) गावातील महिलांनी हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायतीपुढे ठिय्या आंदोलन केले. यावेळी सरपंच मंदा मोरे, ग्रामसेविका स्वाती ताकवले, माजी सरपंच सविता मोरे, लक्ष्मण मोरे, माजी उपसरपंच हारुण सय्यद आदी उपस्थित होते.

सोनवडी सुपे परिसरात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचीही भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ऐन पावसाळ्यात परिसरातील विहीरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. गावात पाणी नसल्यामुळे महिलांना आज ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. चार दिवसात पाण्याचे टॅंकर सुरु नाही झाले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे इशारा यावेळी महिलांनी दिला. 

यावेळी सरपंच मंदा मोरे व ग्रामसेविका स्वाती ताकवले म्हणाल्या, "ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही टॅंकरचा प्रस्ताव दहा दिवसापूर्वी पंचायत समितीला दिला आहे. मात्र अद्याप टॅंकर सुरु झालेला नाही. चार दिवसात टॅंकर मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल." 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Womens rally On Grampanchayat for water in sonvadi supe