कामात ‘ब्रेक’ घ्या, तणावमुक्त राहा’ - अभिषेक ढवाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

बारामती - कोण म्हणतं की, मेंदू हा तसाच राहतो? शरीराबरोबर मेंदूसुद्धा आपण जिवंत असेपर्यंत वाढत राहतो..त्याचे कार्य बदलत राहते.. प्रकृतीसाठी चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा आहे अशा महत्त्वपूर्ण टिप्सपासून ते कामात ‘ब्रेक’ घ्या, तणावमुक्त राहा’ या सल्ल्यापर्यंत अभिषेक ढवाण या युवकाने दिलेला मंत्र राज्यभरातील युवतींसाठी महत्त्वाचा ठरला.

या वर्षीच्या स्वयंसिद्धा संमेलनात फक्त उपदेशापुरते मर्यादित न राहता युवतींनी पुढील वर्षभरास उत्साहाने काम करण्याच्या दृष्टीने अनेक  तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली. त्यामध्ये अभिषेक ढवाण या युवकाने ‘नथिंग टु एव्हरीथिंग’ या विषयावर युवतींशी संवाद साधला. हार्मोन्सच्या असंतुलनाने व्यक्तीवर होणारे विपरीत परिणाम व त्याचा दैनंदिन कामकाजावर होणारा परिणाम याविषयी त्याने विस्तृत मत मांडले. हे करताना त्याने स्वतःवर केलेले प्रयोग व त्याचे मिळालेले लाभ याची माहिती देतानाच व्यवस्थित झोप आणि आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस करावयाचे व्यायाम समजावून सांगितले. 

याच सत्रात विक्रीकर निरीक्षक वंदना चौधरी यांनी ‘स्त्री सक्षमीकरण’ या विषयावर युवतींना प्रबोधित केले. आपल्या स्वप्न व ध्येयापुढे कोणत्याही समस्या मोठ्या वाटू नयेत असेच वर्तन करा, असा सल्ला देतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचा, यशाचा मंत्रही युवतींना दिला. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य आर. बी. देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या सविता व्होरा या व्याख्यानास उपस्थित होते.

Web Title: Work Break Tensionfree Abhishek Dhawan