पुण्यात चांदणी चौकात उड्डाणपुलाचे काम आठवड्यात सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पुणे : चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचे काम येत्या आठवड्याभरात सुरू होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासंदर्भात आज (शनिवार) माहिती दिली. पौड रस्त्यावर यापूर्वीच मेट्रोचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे पौड फाटा येथील सावरकर उड्डाणपुलापासून चांदणी चौकापर्यंत सकाळी आणि सायंकाळी वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू असते. त्यात आता चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामही सुरू होणार आहे. याशिवाय चांदणी चौकात रस्ता रुंदीकरणाचेही काम सुरू होईल. 

चांदणी चौकातून मुंबई, हिंजवडी आयटी पार्क आणि कोल्हापूरच्या दिशेने मोठी वाहतूक होते. येथे उड्डाणपूल करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडला आहे. या कामासाठीचे भूसंपादन करण्याची जबाबदारी पुणे महापालिकेकडे आहे. त्यापैकी 85 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे, अशी माहिती बापट यांनी दिली. शंभर टक्के भूसंपादन झाल्याशिवाय येथील काम सुरू करण्यासाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग विभाग तयार नव्हता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मान्यतेनंतर हे काम सुरू होत आहे, असेही बापट यांनी सांगितले. 

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम हैदराबाद येथील एनसीसी या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश राजमार्ग राष्ट्रीय प्राधिकरणाने काल (शुक्रवार) दिला. हा प्रकल्प एकूण  495 कोटी रुपयांचा असून दीड वर्षात म्हणजे जून 2020 अखेर पुर्ण होईल. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 397 कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्या कंपनीला देण्यात आल्या आहेत. असे बापट म्हणाले. कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर एका आठवड्यात हे काम सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Work on flyover in Chandni Chowk in Pune will start in the week