

WFH Back in Focus: Pune Tech Workers Seek Relief from Daily Traffic Chaos
sakal
पिंपरी : ‘‘अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करावा, इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त प्राधान्य द्यावे आणि कोविड काळाप्रमाणे ‘वर्क-फ्रॉम-होम’ व्यवस्था पुन्हा सुरू करावी,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.११) केले. त्यानंतर आयटी कर्मचाऱ्यांकडून ‘वर्क-फ्रॉम-होम’ची मागणी जोर धरत आहे. आयटी कंपन्यांनी तशी परवानगी द्यावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केली आहे.